चारच महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या नवविवाहित जोडप्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना विजयपूर जिल्ह्यात घडली आहे.
विजयपूर उपनगरातील श्री सिद्धेश्वर गल्ली येथील राहत्या घरी या नवदाम्पत्याने गळफास घेतला आहे. मनोजकुमार पोळ (वय ३०) आणि राखी (वय २३) अशी मृतांची नावे आहेत. गेल्या चार महिन्यांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला होता. काल रात्री दोघांनीही एकत्रित जेवण केले. आणि त्यानंतर दोघांनीही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली आहे. यादरम्यान मनोजकुमार याची आईदेखील बाहेरगावी गेली होती.
आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून घटनेची माहिती मिळताच जलनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जलनगर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


Recent Comments