Belagavi

मन्नीकेरी गावात २१ वर्षानंतर श्री महालक्ष्मी यात्रोत्सव प्रारंभ

Share

भंडाऱ्याची उधळण आणि देवीचा जयजयकार करीत मणिकेरी गावात श्री महालक्ष्मी यात्रेचा रथोत्सव पार पडला . बेळगाव तालुक्यातील मणिकेरी गावात २१ वर्षानंतर श्री महालक्ष्मी देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे .

मंगळवारपासून या यात्रोत्सवाला प्रारंभ झाला . मंगळवारी सकाळी पाच वाजता अक्षतारोपण पार पडले . त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला . नंतर मलगौडा पाटील यांच्या हस्ते फित कापून रथोत्सवाला प्रारंभ झाला .

भंडाऱ्याची उधळण करीत गावातील प्रमुख मार्गावरून रथोत्सव पार पडला . विशेष म्हणजे महिला आणि मुलींनी रथ ओढला . धनगरी ढोलांच्या तालावर हा रथोत्सव पार पडला .

यावेळी राजू मायाण्णा गजानन कागणीकर , पुंडलिक खजगोनट्टी, भरमा सनदी , सुरेश सनदी , सदानंद कालकुंद्रीकर , अण्णाप्पा पाटील , मल्लप्पा दड्डीकर , हेमाण्णा पाटील तसेच मोठ्या संख्यने भाविक उपस्थित होते .

Tags: