बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी नरगुंदकर भावे चौकातील मध्यवर्ती शिवजयंती महामंडळाला भेट देऊन, चित्ररथ मिरवणूक मार्गाची पाहणी केली .
बेळगावमध्ये पारंपरिक रित्या शिवजयंती साजरी केली जाते . त्या निमित्ताने शहरात शिवरायांच्या जीवनावरील सजीव देखावे असलेल्या चित्ररथाची मिरवणूक काढली जाते .
उद्या शनिवारी बेळगाव शहरात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे . शहर पोलीस आयुक्त इदा मार्टिन मार्बीनाग यांनी नरगुंदकर भावे चौकातील मध्यवर्ती शिवजयंती महामंडळाला भेट दिली आणि मिरवणूक मार्गाची पाहणी केली .
यावेळी त्यांनी कायदा व सुव्यस्थेचे उल्लंघन न करता मिरवणूक शांततेत व लवकर पार पाडण्याचे आवाहन केले .

यावेळी त्यांच्यासोबत डीसीपी स्नेहा , डीसीपी रोहन जगदीश , प्रकाश मरगाळे आणि शिवजयंती महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते


Recent Comments