Belagavi

डॉ . बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा स्टॅण्डच्यावतीने शिवजयंती आणि श्री बसवेश्वर जयंतीचेही आयोजन

Share

कणबर्गीच्या विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा स्टॅण्डच्यावतीने , श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि श्री बसवेश्वर महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिंडाल्कोचे दिनेश नाईक , इराप्पा मिशी , ऍड . भैरगौडा पाटील , बसवराज येळ्ळूरकर , अंजन गंडगुदरी , चंद्रकांत कंग्राळकर , अक्षय कोलकार ,सद्गुरू कँटीनचे संतोष , बसू नाईक तसेच सुधीर गड्डे आदी उपस्थित होते .

यावेळी ३० वर्षांची लष्करी सेवा बजावून निवृत्त झालेल्या इराप्पा मिशी यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी अरुण मुचंडीकार , मंजुनाथ , सिद्धाप्पा पुजारी , भावकाण्णा नाईक , स्वप्नील मिरजकर ,महेश मेत्री , करीम काकतीकर , हनीफ , श्रीकांत हरिजन आणि इतर ऊपस्थित होते .

Tags: