Belagavi

बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून बसव जयंती साजरी

Share

बेळगाव जिल्हा प्रशासन व विविध लिंगायत संघटनांनी बसव जयंती उत्साहात साजरी केली. जिल्हा प्रशासन, अखिल भारत वीरशैव महासभा जिल्हा शाखा, बसवेश्वर जयंती उत्सव समिती आणि विविध लिंगायत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बसवेश्वर सर्कल येथील उद्यानातील बसवेश्वरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला .

पडला. जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे , महानगर पालिकेचे आयुक्त लोकेश, कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री व समाजाच्या नेत्यांनी प्रतिमेचे पूजन केले.

यावेळी रत्नप्रभा बेल्लद म्हणाल्या, नवीन बसवेश्वर पुतळ्याची उभारणी होत आहे, नवीन बसवेश्वर पुतळ्याचे बांधकाम झाल्यानंतर विकासासाठी अधिक जागा व सहकार्याची विनंती केली.

यावेळी राहुल शिंदे, आयुक्त पी लोकेश, रत्नप्रभा बेल्लद , रमेश कलासंनावर , गुरु पाटील आदी सहभागी झाले होते.
त्यानंतर माजी आमदार अनिल बेनके यांनी बसवेश्वर सर्कल येथील उद्यानातील श्री बसवेश्वरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

यावेळी बोलताना माजी आमदार अनिल बेनके म्हणाले की, विश्वगुरु बसवेश्वर जातीभेदाची भावना दूर करणारे ते महान व्यक्ती आहेत, बाराव्या शतकातील अनुभव मंटपाची उभारणी करण्याचे श्रेय त्यांना जाते, बसवण्णा यांचे तत्वे आणि आदर्श सर्वांनी अंगीकारले तर जीवन सार्थकी लागेल. .

प्रत्येक घरात दर रविवारी व्रत सोहळ्याचा कार्यक्रम होतो, मात्र राजकीय कारणामुळे हा कार्यक्रम थांबवण्यात आला असून, पुढील काळात घरोघरी हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेचे नीलेश हिरेहोल्ली यांनी बसवण्णा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

 

Tags: