Belagavi

कृपा कोरिशेट्टीचे दहावी परीक्षेत यश

Share

राज्यातील दहावी परीक्षेचे निकाल आज जाहीर झाले असून येथील सेंट मेरी शाळेच्या विद्यार्थिनीने घवघवीत यश संपादन केले आहे.

कृपा महेश करीकट्टी नामक विद्यार्थिनीने दहावी परीक्षेत ६२५ पैकी ६१४ गुण मिळवत शाळेचे नाव उंचावले आहे. कृपेने कन्नड भाषेत १००, इंग्रजीत १२३, गणित ९६, हिंदी १००, विज्ञान ९९ आणि समाज विज्ञान मध्ये ९६ गुण मिळविले आहेत. कृपाने मिळविलेल्या यशाबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Tags: