राज्यातील 25 ते 26 मतदारसंघात भाजप विजयी होईल, असा विश्वास बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केला. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी पत्नीसह शहापूरच्या शासकीय शाळेत येऊन मतदान केले.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, सशक्त भारत घडवण्यासाठी आणि विकसित भारतासाठी मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हायला हवे, राज्यात भाजपसाठी चांगले वातावरण आहे. 25 ते 26 मतदारसंघात भाजपचा विजय होईल, असे ते म्हणाले.
पराभवाच्या भीतीने काँग्रेस नेते हतबल झाले असून त्यांनी काँग्रेसच्या मतदारांना पैसे वाटण्यास सुरुवात केली असून, लोकशाही व्यवस्थेत जनता त्यांना योग्य धडा शिकवेल, असे ते म्हणाले


Recent Comments