उद्या होणाऱ्या निवडणूक मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवी मंदिरात दर्शनाच्या वेळेत किरकोळ बदल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शिवाय मंगळवार आणि शुक्रवार असे आठवड्यातील दोन दिवस रेणुका देवी दर्शनासाठी यल्लम्मा डोंगरावर गर्दी होते. राज्याभरातील पोलीस निवडणूक सेवेत दाखल झाले असून डोंगरावर दर्शनासाठी होणारी गर्दी आणि सुव्यवस्था या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून दर्शन व्यवस्थेत किरकोळ बदल करण्यात आले आहेत. भाविकांनी यल्लम्मा डोंगरावर गर्दी न करता आधी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानाचे कार्यकारी अधिकारी एसपीबी महेश यांनी केले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या देवी दर्शन, पूजा व्यवस्था तात्पुरती बंद करण्यात आली असून धार्मिक विधी मंदिरापुरते मर्यादित आहेत. त्यामुळे भाविकांनी त्या दिवशी डोंगरावर न जाता सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.


Recent Comments