Belagavi

भाजपाला , पर्यायाने मोदींना करा मतदान : जगदीश शेट्टर यांनी केली मतयाचना

Share

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेळगाव येथील चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पदाधिकारी व सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांना आमदार अभय पाटील यांनी पाठिंबा दिला.  गुरुवारी संध्याकाळी चेंबर्स ऑफ कॉमर्स मध्ये बेळगाव लोकसभा भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बैठक घेऊन मतयाचना केली .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक गुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवड करण्यासाठी मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवत आहे . सर्वांनी भारतीय जनता पक्षाला साथ देण्याचे आवाहन जगदीश शेट्टर यांनी केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन सबनीस, राम भंडारी, सी.सी. हुंदिनकट्टी, आनंद देसाई, श्रीधर उप्पिन, रोहन जुवली आदी उपस्थित होते.

Tags: