Belagavi

बेळगावात अक्कमहादेवी जयंतीचे आचरण

Share

१२व्या शतकातील लिंगायत शैव पंथातील अक्कमहादेवी यांच्या जयंतीनिमित्त बेळगावमधील लिंगायत समाजातील महिलांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कारंजीमठाचे गुरुसिद्ध महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लिंगायत भवन येथे आयोजिण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात अक्कमहादेवी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. श्रीमती शोभा जाबीन यांचा संगीत कार्यक्रम आयोजिण्यात आला होता.

यावेळी कारंजीमठाच्या गुरुसिद्ध महास्वामींनी अक्कमहादेवींबद्दलचे माहात्म्य सांगितले. 12 व्या शतकात महिला जागरुकता वाढवून वचनांतून आपल्या भावना अक्कमहादेवी यांनी सांगितल्या. कोणत्याही जाती धर्मात भेदभाव न करता आपल्या जगाला नवी विचारसरणी दिली.

या कार्यक्रमास गुरुसिद्ध महास्वामी, कारंजीमठाच्या मातोश्री गंगा माता, श्रीमती विद्या हाडेकर, शोभा जाबीन, नैना गिरीगौडर, कावेरी केलारी आदी उपस्थित होते.

Tags: