बेळगावमध्ये इंडस्ट्री अकादमीच्या वतीने भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यात उत्तर कर्नाटकातील 100 हून अधिक महाविद्यालयातील मान्यवर उपस्थित होते.
20 एप्रिल 2024 रोजी बेळगाव शहरात प्रथमच शैक्षणिक महासंमेलन झाले, या महासंमेलनात उत्तर कर्नाटकातील विविध जिल्ह्यातील 100 हून अधिक महाविद्यालये सहभागी झाली होती. या संमेलनाचे उद्घाटन विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विद्याशंकर एस. यांच्याहस्ते पार पडले.(फ्लो)
इंडस्ट्री अकादमीचे जी टी गोयल बोलताना म्हणाले, की आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटरची स्थापना करून आणि IT पायाभूत सुविधांना चालना देऊन तसेच मोठ्या IT कंपन्यांना प्रदेशात आकर्षित करून उत्तर कर्नाटक भागात क्रांती घडवून आणण्यासाठी वचनबद्ध आहोत. पउत्साही उद्योग-शैक्षणिक सहयोग निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही हजारो अभियांत्रिकी आणि बिगर-अभियांत्रिकी पदवीधरांना नोकरीच्या संधी आणि उच्च शिक्षणाच्या करिअरसाठी सक्षम बनवण्यासाठी मदत केली आहे. हि अकादमी 20 वर्षांपासून बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत काम करत असून अकादमीची बंगळुरू, पुणे, चेन्नई येथे कार्यालये आहेत.

बेळगाव शहर हे आयटी क्षेत्रात विस्तारत आहेत. बेळगावमध्ये औद्योगिक विकास होत आहे, बेळगावचे व्हीटीयू विद्यापीठ जगभर प्रसिद्ध आहे, शिकण्याची शैली आणि त्यांना दिले जाणारे कौशल्य खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी मजबूत संबंध निर्माण करण्यासाठी सॉफ्ट स्किल्स खूप महत्त्वाची असतात, हे स्किल्स आपल्या अकादमीत शिकविले जातात अशी माहिती अकादमीच्यावतीने देण्यात आली

व्हीटीयूचे कुलगुरू विद्याशंकर म्हणाले की, 20 वर्षांत तंत्रज्ञान खूप बदलले आहे. इंडस्ट्रियल अकादमी औद्योगिक गरजा पूर्ण करण्यासाठी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम आयोजित करते . विद्यार्थ्यांना योग्य संस्थात्मक प्रशिक्षण देऊन आणि त्यांचे आवश्यक ज्ञान वाढवून त्यांना उद्योगासाठी तयार करण्यासाठी सल्ला देण्यात आणि मार्गदर्शन करण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका बजावतो.
व्यासपीठावर ईस्ट पॉइंट कॉलेजचे संचालक डॉ.एम.एम.बगली, संतकुमार हिरेमठ, सौ.पूजा साधुनावर उपस्थित होते.


Recent Comments