Belagavi

गाई-म्हशींची अवैध वाहतूक रोखली

Share

सुवर्ण विधानसौधनजीक गायींची अवैध वाहतूक करणारे वाहन अडवून हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लॉरीवर हल्ला करून चालकाला मारहाण केली.

महाराष्ट्रातून हुबळीकडे लॉरीतून अवैधरित्या घेऊन जाणाऱ्या गायींची सुटका करण्यात आली आहे. बेकायदेशीरपणे गायींची वाहतूक करणाऱ्या एका लॉरी चालकाला 50 हून अधिक हिंदुत्ववाद्यांनी बेदम मारहाण केली ही घटना शहरातील सुवर्णसौधासमोर घडली असनू महाराष्ट्रातून हुबळीकडे निघालेल्या एका लॉरीला महामार्गावर थांबवून दगडफेक करण्यात आली आणि बेकायदेशीरपणे गायींची वाहतूक केल्याप्रकरणी चालकावर हल्ला करण्यात आला. कासारगोड येथील लॉरी चालक उमर मोईद्दीन याच्यावर हल्ला करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

लॉरी चालक उमर याच्यावर हल्ला करण्यात आल्याने त्याच्या डोक्याला, पोटाला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली असून त्याच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर दुसरा लॉरी चालक सुनील कुमार हाही जखमी झाला आहे. डीसीपी रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. सदर घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी या ठिकाणी भेट देऊन हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना शांत केले. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून गायींची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

डीसीपी रोहन जगदीश यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले कि, हल्लेखोरांवर तक्रार दाखल करून तपास करण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता गायी घेऊन जाणारे वाहन थांबविण्यात आले. चालक आणि स्थानिक तरुणांमध्ये वादावादी झाली. चालक आणि क्लिनरवर तरुणांनी हल्ला केला. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी मी माहितीही डीसीपींनी दिली.

Tags: