Vijayapura

विजापूर जिल्ह्यात कार पलटी; दोघे ठार

Share

चालती कार उलटल्याने कारमधील दोघे जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना विजा पूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील डवळगी गावाजवळ घडली.

दोड्डैया पुराणिक मठ (37) पुष्पवती (55) राहणार करभंटनाळ अशी मृतांची नावे आहेत. डवळगीहुन मुद्देबिहाळकडे आपल्या कुटुंबासमवेत जात असताना हा अपघात घडला आहे. या वाहनातून पती पत्नींसह दोन मुले आणि एक वृद्ध महिला प्रवास करत होती. या अपघातात निर्मला दोड्डय्या पुराणिकमठ आणि दोन लहान मुले गंभीर जखमी झाली असून जखमींवर विजापूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची नोंद मुद्देबिहाळ पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. आहेत. मुड्डेबिहाळ पोलीस ठाण्यात ही घटना घडली.

Tags: