Gadag

गदग नगरपरिषद अध्यक्षांच्या मुलासह चौघांची भीषण हत्या

Share

गदग येथील बेटगेरी नगरपरिषदेच्या अध्यक्षा सुनंदा बाकळे यांच्या मुलासह चौघांची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे.

गदग शहरातील चन्नम्मा चौकानजीक घडलेल्या या घटनेत नगरपरिषद सदस्या सुनंदा बाकळे यांचा मुलगा कार्तिक बाकळे (२७) यांच्यासह कोप्पळ येथील परशुराम (५५) लक्ष्मी (४५) आणि आकांक्षा (१७) अशी मृतांची नावे आहेत.

सुनंदा बाकळे यांचा मुलगा कार्तिक बाकळे लग्न ठरविण्याच्या कार्यक्रमासंदर्भात नातेवाईकांच्या घरी १७ एप्रिल रोजी आला होता. दि. १८ एप्रिल रोजी रात्री घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत झोपलेल्या कार्तिक सह इतर चौघांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. अति रक्तस्त्राव झाल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी जिल्हा पालकमंत्री एच. के. पाटील, एसपी बी एस नेमगौडा, एएसपी एम. बी. संकद, डीवायएसपी इनामदार आदींनी भेट देऊन पाहणी केली.

परशुराम हादिमनी, लक्ष्मी आणि आकांक्षा हे तिघेही कोप्पळ येथील भाग्यनगरमधील रहिवासी होते. परशुराम हे हॉटेल व्यावसायिक होते. त्यांनी दोनवेळा भाग्यनगर नगरपंचायतीवर भाजपमधून निवडणूक लढविली होती. मात्र दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तर लक्ष्मी या नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.

Tags: