Vijayapura

विजापुरात अंडी वाहतूक करणाऱ्या दुचाकींचा अपघात

Share

दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना विजापूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळ घडली.

सदर अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून यातील एक दुचाकीवरून अंडी वाहतूक करण्यात येत होती. दरम्यान धडक बसल्याने दुचाकीवरील सर्व अंडी रस्त्यावर पडून फुटल्याने मोठे नुकसान झाले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला असून विजापूर वाहतूक पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

Tags: