कणबर्गी येथी विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा स्टँडच्या वतीने डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली .
यावेळी बसू नाईक यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले . पाहुणे म्हणून अंजन गंडगुदरी , बसवराज येळ्ळूरकर , भैरगौडा पाटील , अक्षय कोलकर , प्रमोद मेत्री , आकाश हलगेकर संतोष आदी उपस्थित होते .
यावेळी उपस्थितांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार केला . डॉ . आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे पालन करण्याचे आवाहन केले . यावेळी , अरुण मुचंडीकर , मंजुनाथ मूथोडकार , सिद्धाप्पा पुजारी , करीम काकतीकर , स्वप्नील मिरजकर , आणि इतर रिक्षाचालक , मालक आणि रहिवासी उपस्थित होते .


Recent Comments