जय बसवजय मृत्युंजय स्वामीजी आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात बोलणे आम्ही ऐकून घेणार नाही, असा कडक इशारा पंचमसाली समाजाच्या नेत्यांनी माजी मंत्री मुरगेश निरानी यांना दिला आहे.
बेळगावात शुक्रवारी पंचमसाली समाजाच्या नेत्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पंचमसाली समाजाचे जिल्हा गौरवाध्यक्ष आर. के. पाटील यांनी लक्ष्मी हेब्बाळकर या पंचमसाली समाजाच्या खऱ्या सदस्य असल्याचे सांगितले. समाजाप्रती असलेल्या निष्ठेसाठी ओळखल्या जाणाऱ्या हेब्बाळकर सातत्याने समाजाच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.
बेळगावमध्ये तणाव निर्माण झाला जेव्हा पंचमसाली समुदायाच्या सदस्यांनी निरानी यांच्या टिप्पण्यांसाठी त्यांचा सामना केला, ज्यामुळे समुदायाचा सन्मान आणि अखंडतेचे रक्षण करण्याचा हेब्बाळकर यांचा संकल्प दिसून येतो. असे ते म्हणाले.
दावणगेरे पंचमसालीचे नेते अशोक म्हणाले की, की, जीएम सिद्धेश्वर यांनी पंचमसाली समाजाबाबत हलके बोलले म्हणून मुरुगेश निरानी यांना फोन करून सांगितले असता, त्यांनी मौन पाळले. पण आता लक्ष्मी हेब्बाळकर पंचमसालीच नव्हे असे म्हणत समाज फोडण्याचे काम निरानी करत आहेत, असा संताप त्यांनी व्यक्त केला होता. रायण्णाच्या काळात शेट्टींनी जी चूक केली तीच चूक ते आता पंचमसाली समाजाच्या बाबतीत ते करत आहेत, असा आरोप केला.
गुंडू पाटील म्हणाले की, मुरुगेश निरानी यांचा कोणत्याही पंचमसाली 2 ए आरक्षण लढ्यात सहभाग नव्हता, कुडलसंगम येथून पदयात्रा सुरू करताना तुम्ही कुठे गेला होता, असा सवाल करून आता तुम्ही बेळगावात राजकारण करायला येऊ नका, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत निंगाप्पा फिरोजी, अशोक महांतेश मास्तीकोप्पा आदी उपस्थित होते.


Recent Comments