बेळगाव मतदारसंघात मी 100 टक्के विजयी होणार आहे. केवळ विजयीच नव्हे तर, 2 लाख मतांच्या फरकाने विजयी होण्याचा आत्मविश्वास असल्याचे जगदीश शेट्टर यांनी सांगितले.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बेळगावमध्ये शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, बेळगाव ही माझी कर्मभूमी आहे. मी स्वतः मुख्यमंत्री असताना बेळगाव येथे सुवर्णविधान सौधचे उद्घाटन झाले होते. मी दोन वेळा बेळगावचा जिल्हा पालक मंत्री म्हणून काम केले आहे.
भू-सिंचनासाठी मी लढलो आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता म्हणून मी या जिल्ह्यासाठी प्रत्येक स्तरावर काम केले आहे. बेळगावचे माझे नाते 30 वर्षांहून अधिक जुने असून 2 लाख मतांच्या फरकाने विजयी होण्याचा आत्मविश्वास आहे. भाजपचे कार्यकर्ते बूथ स्तरावर चांगले काम करत आहेत, असे ते म्हणाले.


Recent Comments