Belagavi

बेळगावात 13-14 एप्रिल रोजी श्रीगुरु राघवेंद्र स्वामी यांच्यावर नाटक

Share

बेळगावात येत्या 13 व 14 एप्रिल रोजी रंगसंपदा नाट्यसंस्थेतर्फे श्री मंत्रालय राघवेंद्र स्वामी यांच्या जीवनावर आधारित नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

बेळगावात कन्नड साहित्य भवन येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत रंगसंपदा नाट्यसंस्थेचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी ही माहिती देऊन सांगितले की, 13 व 14 एप्रिल रोजी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरात श्री राघवेंद्र स्वामीजींच्या जीवनकथेवर आधारित ‘परिमाधवरू’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे.

यावेळी नाट्यप्रयोगाच्या प्रचारपत्रकाचे अनावरण करण्यात आले.  पत्रकार परिषदेला रामचंद्र कट्टी, प्रसाद कारजोळ, दिलीप माळगी, चिदानंद वागळे उपस्थित होते.

Tags: