श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगावच्या वतीने हिंदू नववर्षारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके 1946 गुढीपाडवा छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शहापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी सकाळी प्रेरणा मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीला विधिवत दुग्धाभिषेक घालून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रांत प्रमुख किरण बापू गावडे, जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. तसेच यावेळी गुढीपूजन करण्यात आले. त्यानंतर सौ सुलोचना शिनोळकर, श्वेता कुंटे संगीता कुंटे विद्या पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली ध्येय मंत्र म्हणून मिठाईवाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
यानिमित्त महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. मोठ्या उत्साहात भक्तीभावाने हा कार्यक्रम सर्वांनी पार पाडला. विशेष म्हणजे कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले तसेच हिंदू नववर्षारंभ आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी पुंडलिक चव्हाण, अजित जाधव, विजय कुंटे, मारुती पाटील, सुशांत तरळेकर, आनंद कांबळे, उदित रेगे, वैभव धामणेकर, सागर कांबळे, प्रमोद चौगुले, युवराज पाटील, प्रफुल्ल शिरवळकर, सोमेश बेनके, गिरीश पाटील, गिरीश कनेरी, मिथिला अनगोळकर, वृंदा लिगाडे, पूजा किणीकर, प्रियांका पावशे, अक्षता चौगुले, साई पोटे, श्रेया पोटे, दीपा सोमाजीचे, आरती येरवाडकर तसेच इतर शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments