Belagavi

बेळगावात जैन धर्मीय मुलांसाठी संस्कार शिबिर

Share

मठ गल्ली, बेळगाव येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर चिक्कबस्ती येथे लहान मुलांसाठी धार्मिक संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शालेय सुटीचा सदुपयोग करून घेऊन मुलांमध्ये सदाचार, धार्मिक भावना निर्माण व्हाव्यात या हेतूने मठ गल्ली, बेळगाव येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे जैन ट्रस्ट कमिटी व आराधना महिला मंडळातर्फे जैन धर्मीय मुलांसाठी उन्हाळी धार्मिक संस्कार शिबिर घेण्यात आले.

4 ते 8 एप्रिल या पाच दिवसांच्या या शिबिरात विविध वयोगटातील 180 मुले सहभागी झाली होती. त्यांना जैन धर्मातील तत्व-सिद्धांत, व्रतवैकल्ये, धार्मिक आचरण, पूजाअर्चा, भजन आदींचा परिचय करवून देऊन प्रशिक्षण देण्यात आले.  स्वस्तिक फाउंडेशनच्या वतीने आज शिबिरात आलेल्या 180 मुलांना वह्या आणि पेनचे वाटप करण्यात आले. रत्नश्री हुलबत्ते, नेहा पेदन्नवर, कुमारी रेखा अनगोळ यांनी शिबिराचे संचलन केले.

Tags: