Belagavi

सदैव जनतेसोबत, लोकांच्या प्रश्नांना सदैव प्रतिसाद देणार : मृणाल हेब्बाळकर

Share

निवडणुकीनंतर आमचा पत्ता शोधला जाईल, अशी परिस्थिती नाही. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी आपण सदैव जनतेच्या पाठीशी राहून जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणार असल्याचे सांगितले.

बैलहोंगल विधानसभा मतदारसंघातील अनिगोळ, केंगनूर, संगोळी, तूरकरशिगीहळ्ळी आदी गावांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बुधवारी सायंकाळी ते बोलत होते. बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार माता लक्ष्मी हेब्बाळकर या मतदारसंघातील जनतेच्या सतत पाठीशी आहेत. जेव्हा त्या बेंगळूर, उडुपी येथे कामासाठी जातात तेव्हा मी आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी लोकांच्या समस्या सोडवितो.

कोणत्याही परिस्थितीत लोकांना निराश वाटेल अशी परिस्थिती आली नाही. येत्या काळातही याच धर्तीवर काम करू, आम्ही 24 तास लोकांमध्ये राहून जनतेची सेवा करू, असे ते म्हणाले.

Tags: