बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा बुधवारी बैलहोंगल तालुक्यातील विविध गावात प्रचार करण्यात आला. यावेळी त्यांना सर्वत्र मोठा पाठिंबा मिळाला.

बैलवाड, देवलापूर, अनिगोळ आणि बैलहोंगल तालुक्यातील इतर भागात काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी जोरदार प्रचार केला. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार महांतेश कौजलगी, पक्षाचे नेते ईश्वर उलेगड्डी, बेळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कार्तिक पाटील यांचा प्रचारात सहभाग होता.

सर्व गावातून प्रचंड जनसमुदायाने काँग्रेसला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. हमी योजनेचा प्रत्येक कुटुंबाला फायदा होतो. काँग्रेस पक्षाने बोलल्याप्रमाणे करून दाखवले आहे आणि आपल्या सर्वांचे जीवन सुकर केले आहे. काँग्रेसच्या काळात मतदारसंघात अनेक विकास प्रकल्प आले आहेत. आम्ही सर्व स्थानिक उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना मतदान करू आणि मोठ्या बहुमताने निवडून देऊ, अशी ग्वाही लोकांनी दिली.
लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष सदैव तुमच्या अडचणीत जनतेच्या पाठीशी असेल. स्थानिक आमदार महांतेश कौजलगी यांनीही चांगले काम करून नावलौकिक मिळवला आहे. लोकांशी चांगले संबंध आहेत. मृणाला हेब्बाळकर कामाची आवड असलेले तरुण उमेदवार आहेत, त्यांना मतदान करून आशीर्वाद देण्याची विनंती केली.
महांतेश कौजलगी म्हणाले की, बेळगाव ग्रामीण क्षेत्राचा पूर्वीसारखा विकास करून लक्ष्मी हेब्बाळकर लोकप्रिय बनल्या आहेत. त्यांचा मुलगा मृणाल हा सुसंस्कृत स्वभावाचा तरुण असून लोकसभेवर निवडून आल्यास मतदारसंघाचा विकास होईल. त्यांना मतदान करून लोकसभेवर पाठवू, असे ते म्हणाले.
मृणाल हेब्बाळकर म्हणाले की, लोकसभेवर निवडून आल्यास चांगले काम करून जिल्ह्याचे नाव मोठे करेन. यापूर्वी कधीही न केल्यासारखे काम करून दाखवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments