Belagavi

आगरकर रस्त्यावर धुळीचे साम्राज्य : ड्रेनेजसाठी खोदलेल्या रस्त्याची नाही दुरुस्ती

Share

बेळगाव येथील टिळकवाडी येथील आगरकर रोडवर ड्रेनेजचे काम पूर्ण झाले आहे . मात्र ड्रेनेजची कामकाजासाठी खोदलेला रस्ता दुरुस्त न केल्याने येथील रहिवाशांना धुळीची समस्या भेडसावत आहे

बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघांतर्गत टिळकवाडी येथील आगरकर रोडवर अनेक दिवसांपूर्वी ड्रेनेजचे काम करण्यात आले . यासाठी रस्ता खोदण्यात आला. रस्त्याचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण न झाल्याने वाहनधारक अडचणीत आले आहेत. आगरकर रस्त्यावरील घरे आणि वाहने धुळीने माखलेली आहेत . शिवाय खोदलेल्या रस्त्यामुळे दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना येथून जाणे दिव्य ठरत आहे .

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिक रहिवासी प्रकाश यांनी सांगितले. ड्रेनेजच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला आहे मात्र त्याचे काम अद्याप करण्यात आलेले नाही . . इथल्या रहिवाशांच्या घरात आणि गाड्यांवर धूळ उडत आहेत . शिवाय लोकांनाही धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे . लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली .

आगरकर रोडवरील आणखी एका रहिवाशांनी सांगितले कि ड्रेनेजच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला , महिना झाला तरी रस्त्याचे काम अजून करण्यात आलेले नाही . आम्हाला ह्या खड्ड्यांमुळे आमच्या गाड्या देखील काढता येत नाहीत . सर्व रहिवाशांना जाण्यायेण्यासाठी समस्या निर्माण झाली आहे . लवकरात लवकर ही समस्या दूर करावी अशी मागणी त्यांनी केली .

बेळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर आनंद चव्हाण यांनी आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत . इथल्या ड्रेनेज लाईनचे काम होऊन देखील २ ते ३ महिने झाले आहेत . ह्या रस्त्याच्या कामकाजासाठी आधीच मंजुरी मिळाली आहे . आगरकर रस्त्याचे 8 दिवसात डांबरीकरण पूर्ण करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

Tags: