Belagavi

मृणाल हेब्बाळकर दोन लाख मतांनी होतील विजयी : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा विश्वास

Share

बेळगाव जिल्ह्याच्या मातीचा सुपुत्र मृणाल हेब्बाळकर दोन लाख मतांच्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.

राठी फार्म हाऊस, रामदुर्ग येथे लोकसभा निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या स्वाभिमानी प्रचार सभेत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर बोलत होत्या. रामदुर्गात मिळालेला पाठिंबा पाहता काँग्रेस उमेदवार 2 लाख मतांच्या फरकाने विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

2014 मध्ये मी लोकसभेला उभी राहिले तेव्हा इथल्या लोकांनी मला खूप पाठिंबा दिला, आता दहा वर्षांनी माझा मुलगा आला आहे. मला तुमची सेवा करू द्या. 2014 मध्ये सर्वांनी मेहनत करूनही आपला पराभव झाला. पण, सध्याची परिस्थिती वेगळी आहे. आमचे नेते अशोक पट्टण म्हणाले की, मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे उमेदवार विजयी होईल.
तुम्ही मला जी सेवा करण्याची संधी दिलीत तशी माझ्या मुलालाही तुमची सेवा करू द्या .

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, जहूर हाजी, सुरेश प्राकपूर, रायप्पा कठ्ठी, जे.बी.रंगनगौडर , सोमशेखर सिदलिंगप्पनवर, राजेश्वरी मेटगुड, गायत्री देवांगमठ, मंजुळा देवरेड्डी, चिदानंद दोडमणी आदी उपस्थित होते.

Tags: