Belagavi

बेळगावात पोलीस परेड मैदानावर पोलीस ध्वज दिन

Share

सध्याच्या परिस्थितीत पोलिसांचे काम खूप कठीण बनले आहे. सायबर गुन्हे आणि इतर गुन्हे वारंवार घडू नयेत यासाठी पावले उचलली पाहिजेत. यासाठी पोलिसांनी आपले ज्ञान नेहमीच वाढवले पाहिजे, असे आवाहन आयजीपी विकास कुमार विकास यांनी केले.

बेळगाव पोलिस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मंगळवारी जिल्हा पोलीस मुख्यालयातील पोलीस परेड मैदानावर पोलिस ध्वज दिन साजरा करण्यात आला. बेळगाव शहर राखीव पोलीस, जिल्हा पोलीस, केएसआरपी आदी पोलीस पथकांनी शानदार पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली.

शहर पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बीनांग यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी प्रास्ताविकात बोलताना पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले की, 1965 पासून दरवर्षी देशभरात सर्व राज्यांच्या पोलीस दलातर्फे 2 एप्रिल रोजी पोलीस ध्वज दिन साजरा केला जातो. विभागात काम करून निवृत्त झालेल्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमुख पाहुणे निवृत्त एएसआय मदारसाब इमामसाब वन्नूर म्हणाले की, पोलिसांनी कर्तव्याबरोबरच आरोग्य उत्तम राखणे महत्त्वाचे आहे. आपण २४ तास जनतेसोबत काम करत असतो. सेवाकाळात आपण कसे काम केले हे निवृत्त झाल्यावर कळते.
आयजीपी विकास कुमार म्हणाले की, पोलीस विभागातील सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्तरावर समाज सुधारण्याची संधी आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.

सायबर व अन्य गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आपले ज्ञान वाढवले पाहिजे. प्रत्येकाने केलेल्या कामाचा आदर केला पाहिजे’ समाजात शांतता राखण्यासाठी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. इतर विभागांच्या तुलनेत पोलिस विभाग हा अतिशय चांगला विभाग आहे. पोलीस नसतील तर समाजात अशांतता निर्माण होईल. पोलिसांनी जनतेशी नम्रतेने वागावे व आदर राखावा, असे ते म्हणाले.

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्रीनिवास हांड म्हणाले की, पोलिसांनी कर्तव्याबरोबरच आरोग्य उत्तम राखणे महत्त्वाचे आहे. आम्ही निवृत्त झाल्यावर २४ तास जनतेत मिसळून त्यांच्या वतीने काम करायचो, आम्हाला माहित आहे की पोलिसांचे काम खूप कठीण असते. पोलिसांचे ज्ञान नेहमीच वाढले पाहिजे, असे ते म्हणाले.

यावेळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश, गुन्हे व वाहतूक विभागाच्या डीसीपी स्नेहा पीव्ही यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Tags: