Belagavi

जगदीश शेट्टर यांचा बेळगाव दक्षिणमध्ये जोरदार प्रचार

Share

बेळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आज बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचार फेरी कडून मतदारांशी संपर्क साधत मतयाचना केली.

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर सध्या बेळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवीत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी जोरदार प्रचार मोहीम सुरु केली आहे. आज, मंगळवारी बेळगाव दक्षिण मतदारसंघात प्रचारफेरी काढून त्यांनी मतदारांशी संपर्क साधला. विकसित बेळगावसाठी भाजप पक्षाला साथ द्यावी अशी विनंती त्यांनी केली. त्याचप्रमाणे वडगाव येथील विणकर समाजाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांनी प्रचार केला.

यावेळी माजी राज्यसभा सदस्या प्रभाकर कोरे, आमदार अभय पाटील, उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक रवी धोत्रे, नगरसेविका रेश्मा कामकर, दिपाली टोपगी, प्रीती कामकर, उदय उपरे, बंडू चौधरी, शंकर बुचडी किशोर वडगावी, व्यंकटेश वनळ्ळी, मोहन कोपर्डे यांच्यासह विणकर समाजाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: