सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे येत्या १४ एप्रिल रोजी असणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आचारसंहिता उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेऊन साजरी करावी असे आवाहन एपीएमसी पोलीस स्थानकाचे निरीक्षक ख्वाजा हुसेन यांनी केले.
बेळगावातील आंबेडकर नगरात आज, सोमवारी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासंदर्भात रहिवाशी आणि उत्सव मंडळ, युवक मंडळ पदाधिकाऱ्यांची पूर्वतयारीची बैठक झाली. त्यावेळी विशेष निमंत्रित म्हणून बोलताना एपीएमसी पोलीस स्थानकाचे निरीक्षक ख्वाजा हुसेन यांनी मार्गदर्शन केले.
ते पुढे म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात आदर्श ठरेल अशी भारतीय राज्य घटना लिहिली आहे. त्यांची जयंती साजरी करताना कसलेही गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता सर्वानी घ्यावी. तसेच निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करून जयंती साजरी करावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय कुडची, उपाध्यक्ष सागर चौगुले, सचिव संजय अळगुंडीकर, खजिनदार विवेक राव, गुंडू गुंडप्पन्नावर तसेच आंबेडकर नगर पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments