Belagavi

बेळगावात वैश्यवाणी समाजातर्फे राजाराम महाराज जन्मोत्सव

Share

हळदीपूर येथील श्री. शांताश्रम मठाच्या गोवावेस सर्कल बेळगाव येथील शाखेत श्री. चिदंबरदास राजाराम महाराज व पांडुरंग महाराज समाधी येथे बुधवारी तुकाराम बीज सोहळा व श्री राजाराम महाराज जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

यानिमित्त सकाळी काकड आरती झाली. त्यानंतर श्री. तुकाराम महाराजांच्या मूर्तीला व श्री. राजाराम महाराजांच्या मूर्तीला रुद्राभिषेक करून पूजन करण्यात आले. त्यानंतर सकाळी भक्ती संस्कृती भजनी मंडळ, बापट गल्ली यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. दुपारी 12 वाजता श्री. राजाराम महाराज यांचा पाळणा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी वैश्यवाणी महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा भारती केसरकर, विद्यमान अध्यक्षा अंजली किनारी, सचिव वैशाली पालकर, वर्षा सटवानी, अश्विनी कलघटगी, पूजा मालशेट, अक्षता कलघटगी, जयश्री हणमशेठ यांनी श्री तुकाराम महाराज व श्री राजाराम महाराजांचा पाळणा म्हटला. याप्रसंगी वैश्य वाणी समाजाचे माजी अध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष बापूसाहेब अनगोळकर, अशोक मुरकुंबी, विशाल मुरकुंबी, श्याम नाकाडी, शेखर नाकाडी, सुभाष बाळेकुंद्री, सुरेंद्र मिठारी, काशिनाथ कुदळे, विजयकुमार मुरकुंबी, विकास कलघटगी, सतीश अनगोळकर, मधुसूदन किनारी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. चिदंबर महेश ग्रमोपाध्ये, अथर्व जोशी यांनी पौराहित्य केले.

यावेळी महाप्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी सर्व वैश्य समाज बांधव व भक्तजनानी मोठ्या संख्येने भाग घेतला होता.

Tags: