Belagavi

यंदा यल्लम्मा मंदिरात 11.23 कोटींचे दान संकलन

Share

बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध सौंदत्ती डोंगरावरील रेणुका-यल्लम्मा देवीच्या मंदिरात हुंडीमध्ये 2023-24 मध्ये 11.23 कोटी दान संकलन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे दान 2.40 कोटीने वाढले आहे.

सौंदत्ती डोंगरावरील रेणुका-यल्लम्मा देवस्थान हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. देशाच्या विविध भागातून येथे येणारे भाविक मंदिराच्या दानपेटीत रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने दान म्हणून टाकून आपली भक्ती अर्पण करतात. यावेळी भीषण दुष्काळ असून देखील दानाचा महापूर वाहून आला आहे, हा एक विक्रमच आहे.

2022-23 मध्ये यल्लम्मा देवीला 8.01 कोटी रोख रक्कम, 66.28 लाख किमतीचे सोने आणि 15.43 लाख किमतीचे चांदीचे दागिन्यांसह 8.83 कोटी रुपये अर्पण करण्यात आले. 2023-24 मध्ये हुंडीमध्ये 10.22 कोटी रोख, 84.14 लाख सोने आणि 16.65 लाख चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले आहेत.

 

 

Tags: