बीम्स कॉलेज अँड स्कूल ऑफ नर्सिंगचा शानदार दीपदान आणि शपथविधी सोहळा आज बीम्स सभागृहात पार पडला. यावेळी नर्सिंग प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विध्यार्थ्यानी दिव्याला साक्षी ठेवून मानवतावादी रुग्णसेवेच्या कर्तव्याची शपथ घेतली.
बेळगाव इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या कॉलेज अँड स्कूल ऑफ नर्सिंगच्या प्रशिक्षणप्राप्त विद्यार्थ्यांचा शानदार दीपदान आणि शपथविधी सोहळा आज गुरुवारी बीम्स सभागृहात पार पडला. बंगळूरच्या केएसडीएनइबीचे सचिव मडिवाळप्पा नागरहळ्ळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बीम्सचे डीन आणि संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी होते. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि आधुनिक नर्सिंगच्या प्रणेत्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपदान समारंभाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी हातात मेणबत्त्या घेऊन नर्सिंग विध्यार्थी-विद्यार्थिनींनी रुग्णसेवेच्या मानवतावादी सेवेची शपथ घेतली. प्रमुख पाहुणे मडिवाळप्पा नागरहळ्ळी यांनी त्यांना नर्सिंग सेवेचे महत्व सांगून कर्तव्याची शपथ दिली. यावेळी बोलताना बीम्स कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य नामदेव माळगी नर्सिंग हा व्यवसाय मानवसेवेची संधी देणारा उत्तम व्यवसाय आहे. बीम्स नर्सिंग कॉलेजमध्ये विध्यार्थ्यांना जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर नर्सिंग क्षेत्रात होत असलेल्या आधुनिक बदलांची नोंद घेत परिपूर्ण दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येते. येथे मिळालेल्या काळाशी अनुरूप शिक्षणाचा विध्यार्थ्यानी आपल्या व्यावसायिक जीवनात कौशल्याने वापर करून मानवसेवेचे व्रत अंगीकारावे असे आवाहन त्यांनी केले. बीम्स नर्सिंग कॉलेजच्या विध्यार्थ्यानी आजवर गुणवत्ता राखून उच्च निकालाची परंपरा कायम ठेवल्याचे सांगून प्रशिक्षणप्राप्त विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या
बीम्स सरकारी नर्सिंग स्कूलचे प्राचार्य प्रकाश कोडली यांनी बीम्स स्कूल ऑफ नर्सिंग आणि स्कूलमध्ये विध्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षणासोबतच प्रत्यक्ष सेवेचा अनुभव यावा यासाठी उचगाव, कडोली समुदाय आरोग्य केंद्र, भारतीय कुटुंब कल्याण संस्था, बीम्स हॉस्पिटल, व्हॅक्सिन डेपो आदी ठिकाणी नियुक्त करण्यात येते. इंडियन नर्सिंग कौन्सिलचा नियमित अभ्यासक्रम शिकविण्यासोबतच कार्यानुभव दिला जातो. विद्यार्थ्यांनीही मन लावून अभ्यास करून यश प्राप्त केले आहे. २०२२-२३चा निकाल ९८% लागल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना सहाय्यक प्राध्यापक सचिन परमशेट्टी म्हणाले की, दीपदान सोहळा हा प्रत्येक प्रिचारकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो. नर्सिंग व्यवसायाचे ज्ञान, कौशल्य हस्तांतरित करण्याचा हा सोहळा त्याशिवाय आधुनिक नर्सिंगच्या संस्थापिका फ्लोरेन्स नाईटिंगेल यांना अभिवादन करून नर्सिंगच्या व्यावसायिक जीवनात प्रवेश करण्याचा हा क्षण मानला जातो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी गुणवंत विध्यार्थी-विद्यार्थिनींचा पाहुण्यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रमाणपत्रे देऊन सत्कार करण्यात आला. फ्लो
समारंभात बीम्स हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इरण्णा पल्लेद, जिल्हा सर्जन डॉ. विठ्ठल शिंदे, निवासी वैद्याधिकारी डॉ. सरोज तिगडी, बीम्स नोडल ऑफिसर डॉ. पुष्पा एम. जी., शिल्पा वाली, नर्सिंग अधीक्षक एल. एस. पंगन्नावर यांच्यासह नर्सिंगचे विध्यार्थी-विद्यार्थिनी, त्यांचे पालक आदी उपस्थित होते.


Recent Comments