Belagavi

बेळगाव-चिक्कोडीमध्ये मोठ्या मताधिक्क्याने जिंकू : रवीकुमार

Share

बेळगाव आणि चिक्कोडीमध्ये आमचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास भाजप नेते रविकुमार यांनी व्यक्त केला.

बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप नेते रविकुमार म्हणाले की, बेळगावच्या भाजप नेत्यांनी सर्वांशी चर्चा केली आहे, आमच्यात कोणताही असंतोष नाही, जिल्हा दौऱ्याची यादी करण्यासाठी बेळगावच्या नेत्यांनी बीएसवायकडे दोन दिवसांचा अवधी मागितला आहे. यादी तयार झाल्यावर येडियुरप्पा यांच्यासह जिल्ह्यातील भाजप नेते प्रचारदौरा करणार आहेत. रमेश व भालचंद्र जारकीहोळी बंधूंनीही आपण प्रचार मोहिमेला येणार असल्याचे सांगितले आहे, असे ते म्हणाले.

जो काँग्रेस पक्ष इतके दिवस भगव्याला विरोध करत होता, त्याला आता भगव्याबद्दल प्रेम कसे काय आले, मांस खाऊन मंदिरात जाणाऱ्या नेत्यांचा हा पक्ष, ज्या पक्षाने गोरक्षा कायदा मागे घेतला, गोमांस खाण्यात काय चूक? असा सवाल केला त्या पक्षाला आता गोमाता आणि भगवा कसा काय आवडू लागला?, अशी फटकेबाजी त्यांनी केली.

काँग्रेस पक्षात उमेदवार नसल्याने मंत्र्यांची मुले निवडणुकीला उभी आहेत. भाजपच्या मोदी हमीपुढे त्यांची हमी धुऊन जाईल, असे सांगून ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे, असा दावा रवीकुमार यांनी केला.

Tags: