मोदींच्या विरोधात बोलल्याने आपण मोठे होऊ हा सिद्धरामय्या यांचा भ्रमनिरास आहे. असे बोलणे कमी करा, ते मुख्यमंत्री पदाला शोभत नाही असे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी सुनावले.

बेळगावमध्ये येडियुरप्पा यांनी आज बुधवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्ही बेळगावसह सर्व 28 मतदारसंघ जिंकू, असा दावा केला. जगदीश शेट्टर हे बाहेरचे आहेत, असे कोणालाच वाटत नाही. आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना तिकीट दिले आहे. शेट्टर यांच्यासारख्या महान नेत्याची आपल्याला गरज असल्याचे ते म्हणाले.

मोदींच्या विरोधात बोलल्याने आपण मोठे होऊ हा सिद्धरामय्या यांचा भ्रमनिरास आहे. असे बोलणे कमी करा, ते मुख्यमंत्री पदाला शोभत नाही. त्यांनी विचारपूर्वक बोलावे, असा सल्ला बीएसवायनी दिला. एचडी कुमारस्कामी हे मंड्यातून निवडणूक लढवतील याची खात्री आहे, सुमलता यांना आणखी एक संधी आहे. लवकरच मी त्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments