विजयपूर शहरातील गांधी चौक पोलिसांनी धडक कारवाई करत तीन आरोपींना अटक करून त्याच्याकडून 26 दुचाकी जप्त करण्यात आल्या .

गांधीचौक पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेला संबोधित करताना एसपी ऋषिकेश सोनावणे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून शहरात दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर ॲडिशनल एसपी शंकर मारिहाळ व रमण गौडा हट्टी , विजयपूर शहर डीवायएसपी बसवराज यलीगार यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीचौक सीपीआय महांतेश के. धामण्णा यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने या आरोपींना अटक केल्याचे त्यांनी सांगितले. दुचाकी चोरीच्या प्रकरणांची माहिती गोळा करून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. तसेच बागलकोट जिल्ह्याच्या दिशेने शास्त्रोक्त पद्धतीने माहिती संकलित करण्यात आली. या सर्व माहितीच्या आधारे 25 मार्च रोजी तीन आरोपींना अटक करण्यात आली.

त्यापैकी सुनिल भीमप्पा गड्डी (३१) हा मूळच्या बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील चिंचगुंदी येथील रहिवासी असून सध्या विजयपूर शहरातील योगपुर कॉलनी पाण्याच्या टाकी जवळ राहतो . तो टाटा एसचा चालक आहे . तर मोशीन बाबूलाल कलादगी (24) आणि सद्दाम मुन्ना मुथवल्ली (20), या दोघा जे एम रोडवरील केएचबी कॉलनीतील सेंटरिंग कामगारांना अटक करण्यात आली आहे. विजयपूर गांधीचौक पोलिसांनी जप्त केलेल्या चोरीच्या दुचाकी ह्या विजयपूर , , बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी आणि मुधोळ येथून चोरल्या होत्या .

या आरोपींकडून 25.60 लाख रुपये किमतीच्या 26 दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या कारवाईत गांधीचौकचे पीएसआय एस. के. मन्निकेरी, एस. बी. खोत, आर. के. गवार, कर्मचारी शिवानंद अल्लीगीदादा, बाबू के. गुडीमणी, एच. एच. जमादार, अनिल दोड्डमणी, आर. व्ही. नायक , आसिफ रिसालदार , बशीर अहमद एम. शेख, चिदानंद गिडगंची, रमणगौडा बिरादार , बी. एम. हदलगेरी, विनायक कडलीबालू, सुधीर गड्याल, मायाप्पा टोपनगोळ , रविकिरण गुत्तरगी, कुमार राठोड, सुनिल ओर्डे, तांत्रिक कर्मचारी सुनिल गोवळी, गुंडू गिरनीवड्डर आणि मतिन बागवान सहभागी झाल्याचे एसपी ऋषिकेश सोनवणे यांनी सांगितले.


Recent Comments