विमानतळांवरदेखील निवडणूक आचारसंहितेची कडक अमलबजावणी करण्यात येत आहे. बेळगाव सांबरा विमानतळावर जसवीर सिंग नावाच्या व्यक्तीकडून निवडणूक अधिकाऱ्यांनी 1.50 लाखांची रोकड जप्त केली.
तहसीलदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मारिहा येथील एफएसटी पथकाचे शशिकांत कुळेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन व्यक्तीकडून बॅगेतील रोकड जप्त केली.
याप्रकरणी मारिहाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जसवीर सिंग नावाचा हा प्रवासी बेंगळूरहुन विमानाने बेळगावला आला होता. जप्तीची माहिती अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना दिली


Recent Comments