विधानसभा सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या राजकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी ‘मुरगोड मुकुट’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यांच्या वतीने त्यांच्या भगिनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मुरगोड महंत मठाच्या जत्रा महोत्सवानिमित्त जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी व महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बुधवारी सायंकाळी मठाला भेट दिली. त्यांनी महंत अज्ज यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून श्री नीळकंठ महास्वामी यांचे आशीर्वाद घेतले.

त्याचवेळी राजकीय क्षेत्रातील कर्तृत्ववानांच्या यादीत विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची ‘मुरगोड मुकुट’ पुरस्कारासाठी निवड झाली असून त्यांच्या वतीने त्यांच्या भगिनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, युवक काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर, जिल्हा काँग्रेसचे नेते महांतेश मत्तीकोप्प, युवक काँग्रेस अध्यक्ष कार्तिक पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments