बेळगाव महापालिकेतर्फे झोपडपट्टीवासीयांना देण्यात येणारी घरे बेकायदेशीरपणे इतरांना दिली जात असल्याचा आरोप आलेमारी बुडकट्टू महासभेचे अध्यक्ष हनुमंता टिकोळ यांनी केला आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गुरुवारी झोपडपट्टीवासीयांनी निदर्शने करून बेळगाव महापालिकेतर्फे झोपडपट्टीवासीयांना देण्यात येणारी घरे बेकायदेशीरपणे इतरांना दिली जात असल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आलेमारी बुडकट्टू महासभेचे अध्यक्ष हनुमंता टिकोल म्हणाले की, बेळगाव महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी श्रीनगर येथील झोपडपट्टीवासीयांची घरे इतर लोकांना देऊन अन्याय केला आहे. तसेच वंटमुरी येथे राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांची घरे कोसळत असल्याने अधिकाऱ्यांनी याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.


Recent Comments