पंजाबमधील लुधियाना येथे आयबीबीएफ इंडिया व पंजाब शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व्या मिस्टर इंडिया राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाच्या राम निवासने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मिस्टर इंडिया चॅम्पियन ऑफ चॅम्पिअन्स हा मानाचा ‘किताब पटकावला.
महाराष्ट्राच्या महेश पाटीलने पहिले उपविजेतेपद, मणिपूरच्या मॅराडोना ख्रिस्तीने दुसरे उपविजेतेपद पटकावले. महिलांच्या गटात महाराष्ट्राची हर्षदा पवार व इंगुजम कविता चानू यांनी विजेतेपद मिळवले. सांघिक स्पर्धेत रेल्वेने ४२५ गुणांसह वैयक्तिक विजेतेपद, ३१० गुणांसह महाराष्ट्राने पहिले पदक ८५ गुणांसह मणिपूरने दुसरे विजेतेपद मिळवले. महिलांच्या गटात मणिपूरने ७५ गुणांसह विजेतेपद, ७० गुणांसह महाराष्ट्राने उपविजेतेपद तर २५ गुणांसह असं व मध्य प्रदेशने दुसरे उपविजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुणे वर्दळ बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे सेक्रेटरी चेतन पठारे, इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे अध्यक्ष टी. व्ही. पॉली, जनरल सेक्रेटरी हिरल सेठ, मिस्टर युनिव्हर्स पद्मश्री प्रेमचंद डोग्रा, आशियायी पंच अजित सिद्दण्णावर आदींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.


Recent Comments