बेळगाव जिल्हा क्रीडा संघटनेच्या अध्यक्षपदी गजेंद्र काकतीकर यांची तर कार्यवाहपदी जितेंद्र काकतीकर यांची निवड करण्यात आली आहे.
अखिल कर्नाटक स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांच्यावतीने बेंगळुरू येथे दि. 15 मार्च 2024 रोजी पद निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत बेळगाव जिल्हा क्रीडा संघटनेच्या अध्यक्षपदी गजेंद्र काकतीकर यांची व कार्यवाह म्हणून जितेंद्र काकतीकर यांची निवड करण्यात आली.
अखिल कर्नाटका स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष अरुण माच्या व कार्यवाह भार्गव रेड्डी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच बेळगाव जिल्हा कराटे संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून रमेश अलगुडेकर, खजिनदारपदी दीपक काकतीकर आणि स्पोर्ट्स कमीशन मेंबर विठ्ठल भोजगार व टोर्नामेंट को-ऑर्डीनेटर म्हणून परशुराम काकती, अक्षय परमोजी, प्रभाकर किल्लेकर यांची निवड करण्यात आली.


Recent Comments