Vijayapura

विजयपूर लोकसभा निवडणुकीसाठी आखाडा सज्ज : भाजपाला अंतर्गत फटका बसण्याची चिन्हे

Share

विजयपूर लोकसभा निवडणुकीसाठी आखाडा सज्ज झाला आहे.काँग्रेस आणि भाजप पक्षाचे उमेदवारही जाहीर झाले आहेत. प्रचार जोरात सुरू आहे. मात्र, भाजपला अंतर्गत फटका बसण्याची सर्व चिन्हे दिसत आहेत. विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार रमेश जिगजीनगी अडचणीत आले आहेत.

विजयपूर जिल्ह्यात भाजपमधील असंतोष उफाळून आला आहे. बंजारा समाजाचे नेते व भाजपचे वैद्यकीय अभियानाचे नेते बाबू राजेंद्र नायक यांनी उमेदवार बदलून रमेश जिगजीनगी यांना उमेदवारी देऊ नये अन्यथा बंजारा समाजाच्या पाठिंब्याने बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मला तिकीट देणार असल्याची माहिती हायकमांडने दिली. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी कट रचून मला तिकीटापासून वंचित ठेवले.

आमची लढाई भाजपविरोधात नसून उमेदवार रमेश जिगजीनगी यांच्याविरोधात असल्याचे सांगत त्यांनी पक्षविरहित उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ.बाबुराजेंद्र नाईक यांचे जिल्ह्यात चांगले नाव व फॅन फॉलोइंग असून स्पर्धा निश्चित झाल्यास जिगजीनगी याना अवघड जाणार असल्याची चर्चा आहे.

Tags: