देशाच्या सद्यस्थितीत काँग्रेस पक्षाचा विजय अपरिहार्य असून त्यांनी आजपासूनच आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करा, असे आवाहन काँग्रेस युवा नेते व सतीश शुगर्सचे संचालक राहुल जारकीहोळी यांनी केले.
यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील पाच्छापूर, करगुप्पी, यल्लापूर, बसापूर या गावांमध्ये झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बुथस्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना राहुल जारकीहोळी म्हणाले की, काँग्रेस हायकमांड उमेदवारांची निवड करेल आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन पक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करण्याचे आवाहन केले.
युवा नेत्या प्रियंका जारकीहोळी म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाच्या हमी योजना राज्यातील साडेचार कोटी जनतेपर्यंत पोहोचत आहेत. भाजप सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जनतेला काँग्रेस सरकारच्या हमी योजना आर्थिक बळ देत आहेत. अशा लोकाभिमुख योजना देणाऱ्या काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ स्तरावर पक्षाची बांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. निवडणुकीसाठी तातडीने तयारी करावी. पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. पक्षाचे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.
यावेळी यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील पाच्छापूर, करगुप्पी, यल्लापूर, बसापूर या गावातील बुथ स्तरावरील कार्यकर्ते, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments