बेळगावातील नागनूर रुद्राक्षी मठाच्या एस. जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते पार पडले.
बेळगावातील शिवबसव नगरातील नागनूर रुद्राक्षी मठाच्या आवारात असलेल्या एस. जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयाच्या विध्यार्थी वसतिगृहाचे भूमिपूजन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते आज सोमवारी पार पडले. नागनूर रुद्राक्षी मठाचे श्री अल्लमप्रभू महस्वामीजींच्या अध्यक्षतेखाली व गदग डम्बळ तोंटदार्य मठाचे डॉ. सिद्धराम महास्वामी यांच्या सानिध्यात झालेल्या या कार्यक्रमात मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कुदळ मारून भूमिपूजन केले. यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, विविध मठाधीश आदींचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी डॉ. मल्लिकार्जुन मुरुगराजेंद्र महास्वामी, नागनूर रुद्राक्षी मठाचे अल्लम प्रभू महास्वामी, विजयपूर-हुबळी सिद्धारूढ मठाचे डॉ. अभिनव सिद्धारूढ महास्वामी, प्राचार्य डॉ. बी. आर. पटगुंदी, कार्याध्यक्ष डॉ. एफ. व्ही. मानवी, लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, सुजित मुळगुंद आदी उपस्थित होते.


Recent Comments