बेळगावचे आणि राजकुमार घराण्याचे अतूट नाते आहे. या भागातील लोकांच्या प्रेमाचे आणि विश्वासाचे आम्ही सदैव ऋणी आहोत, असे अभिनेते डॉ. शिवराजकुमार म्हणाले.
‘करटक दमनक’ कन्नड चित्रपटाच्या विजय मिरवणुकीसाठी बेळगावातील प्रकाश सिनेमागृहात आज मंगळवारी ‘करटक दमनक’ चित्रपटाच्या टीमचे आगमन झाले आणि बेळगावच्या प्रेक्षकांचे प्रेम पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. अभिनेता शिवराजकुमार यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. ‘करटक दमनक’ या चित्रपटाचे दिग्दर्शन योगराज भट्ट यांनी अतिशय छान केले आहे.

उत्तर कर्नाटकाही भाषाशैली, लहेजा, प्रभू देवासोबतचा अभिनय खूपच चांगला झाला आहे. त्याला लोकांचाही चांगला पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘करटक दमनक’ या चित्रपटात प्रामुख्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे महत्त्व सांगितले आहे, असे ते म्हणाले.
योगराज भट्ट बोलताना म्हणाले की, मी मुळचा दुष्काळी उत्तर कर्नाटकाचा असून तेथून चित्रपटसृष्टीत आलो आहे, आम्ही आमच्या भागावर आधारित फिल्म चित्रपट प्रेमींसाठी तयार केली आहे. सर्वांनी हा वेगळा कन्नड चित्रपट पाहण्याची विनंती केली.
यावेळी अभिनेता आर. अभिलाष, ‘करटक दमनक’ चित्रपटाचे क्रू आणि चाहतेही उपस्थित होते.


Recent Comments