बस चालवताना बसचालक मोबाईलवर बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
कल्याण कर्नाटक रोड ट्रान्सपोर्टच्या चालकाकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे . विजयपूरहून इंडी शहराकडे जाणारी बस क्रमांक KA 28 F 2466 ह्या बसचा बसचालक मोबाईल फोनवर बोलत असून बस चालवतानाचे दृश्य प्रवाशाच्या मोबाईलमध्ये कैद झाले आहे.
चालकाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. मोबाईलवर बोलत बस चालवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बेदरकार चालकावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


Recent Comments