Belagavi

प्रत्येकवेळी नेत्यांचे ऐकायला मी फुटबॉल नाही : प्रकाश हुक्केरी

Share

लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह मला होत आहे. मी लढलो तर चिक्कोडी मतदारसंघ जिंकू, असा हिशोब आहे. परंतु आपण कोणत्याही कारणास्तव लोकसभा निवडणूक लढवणार नाही. प्रत्येकवेळी नेत्यांचे ऐकायला मी फुटबॉल नसल्याचे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी स्पष्ट केले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी म्हणाले की, 2014 मध्ये मंत्री असूनही मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मी लोकसभा लढवली आणि जिंकलो. तेव्हा गणेश हुक्केरी यांना त्यांनी मंत्री करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मुलगा गणेश आमदार म्हणून निवडून आला, पण मंत्री झाला नाही. मी किंवा माझ्या मुलाने मंत्रिपद मागितले नाही, अन मागणारही नाही, असे ते म्हणाले.

आता लोकसभा निवडणूक लढवण्याचा दबाव आहे. मी लढलो तर चिक्कोडी मतदारसंघ जिंकू, असा हिशोब आहे. पण कोणत्याही कारणास्तव मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. चिक्कोडीची उमेदवारी धनगर समाजाला दिल्यास आमचा विजय होईल. चिक्कोडी लोकसभा मतदार संघात धनगर समाजाची लोकसंख्या 3 लाख आहे. त्या समाजाचे लक्ष्मणराव चिंगळे यांना काँग्रेसची उमेदवारी दिल्यास आम्ही जरूर जिंकू असे ते म्हणाले.

2023 मध्ये माझा मुलगा आमदार गणेश 78,000 च्या फरकाने विजयी झाले, पण त्यांना मंत्री केले नाही. मी किंवा माझ्या मुलाने मंत्रीपद मागितले नाही. मी विधानपरिषद सदस्य म्हणून कायम राहणार आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि हायकमांडने लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितल्यानंतरही आपण निवडणूक लढवणार नसल्याचे प्रकाश हुक्केरी यांनी स्पष्ट केले होते. मात्र त्यांनी आपल्या मुलाच्या निवडणुकीबाबत कोणतेही संकेत दिले नव्हते. आता मुलगा आमदार गणेशसुद्धा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Tags: