Belagavi

कडोली दुरदुंडेश्वर मठात महाशिवरात्री जत्रा उत्साहात

Share

बेळगाव तालुक्यातील कडोली गावातील श्री दुरदुंडेश्वर मठ येथे महाशिवरात्री जत्रा महोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

यमकनमर्डी मतदारसंघातील कडोली गावातील श्री दुरदुंडेश्वर मठ येथे पारंपरिक उत्साहात व जल्लोषात महाशिवरात्री जत्रा साजरी करण्यात आली. जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते जत्रा महोत्सवाच्या कार्यक्रमांचा शुभारंभ आणि मठाच्या आवारात नव्याने बांधलेल्या दुकानांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, कडोली दुरदुंडेश्वर मठाला एक चांगली अध्यात्मिक परंपरा आहे. सर्व जाती-धर्माचे लोक येथे एकत्र येतात. या [रिसराच्या आणि कडोली गावच्या विकासासाठी मी वचनबद्ध आहे.  यावेळी दुरदुंडेश्वर मठाचे श्री गुरुबसवलिंग महास्वामीजी यांचे आशीर्वचन झाले. तसेच निवृत्त प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिवरेमठ व अन्य मान्यवरांची भाषणे झाली. बेळगावच्या कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

मठाच्या शिवरात्री जत्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यानिमित्त हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मठाच्या परिसरात खेळणी व अन्य साहित्यांची दुकाने मांडण्यात आली होती.  याप्रसंगी कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, सेवानिवृत्त प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे, माजी तालुका पंचायत सदस्य उदय सिद्दण्णावर, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू मायाण्णा, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्यासह जत्रा महोत्सव समिती कडोलीचे सर्व सदस्य, श्री दुरदुंडेश्वर विरक्तमठाचे भक्त व बेळगाव जिल्हा पालक मंत्री यांचे स्वीय सहाय्यक पांडू मण्णीकेरी व अनेक नेते उपस्थित होते.

Tags: