Belagavi

बेळगावात 5 किलोमीटर अंतराची पोलीस मॅरेथॉन

Share

कर्नाटक राज्य पोलिस दलाच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवाचा एक भाग म्हणून बेळगावात आज 5 किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयापासून सुरू झालेल्या मॅरेथॉनला बेळगावचे आयजीपी विकासकुमार विकास यांनी हिरवा झेंडा दाखवून चालना दिली. या मॅरेथॉन स्पर्धेत 500 हून अधिक पोलीस कर्मचारी व मुलांनी सहभाग घेतला. पोलीस आयुक्त कार्यालयापासून चेन्नम्मा सर्कल, अशोक चौक, खडे बाजार मार्गे फिरून मॅरेथॉनची पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ सांगता झाली.

यावेळी बोलताना डीसीपी रोहन जगदीश यांनी सांगितले की, कर्नाटक राज्य पोलिसांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा एक भाग म्हणून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनचा ​​उद्देश अंमली पदार्थ सेवन आणि त्याचे दुष्परिणाम याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे.

उत्तर विभागाचे आयजीपी विकासकुमार विकास यांनी सर्व मॅरेथॉन धावपटूंना शुभेच्छा दिल्या. पोलीस इन्स्पेक्टर कालीमिर्ची यांनी सूत्रसंचालन केले. या मॅरेथॉनमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: