चालत्या कारला आग लागून अपघात झाला, सुदैवाने कारमधील दोघे जण बचावले.विजयपूर जिल्ह्यातील चडचण शहरातील झलकी आणि बेल्लोळी रस्त्यावर ही घटना घडली.

चालत्या कारमध्ये अचानक आग लागली. तात्काळ ड्रायव्हर आणि अन्य एकाने गाडीतून बाहेर पडून त्यांचे प्राण वाचवले. विजयपुर येथून सोलापूरला जात असताना हा अपघात झाला. कारबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. ही घटना चडचण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.



Recent Comments