Vijayapura

विजयपूरमध्ये केशकर्तनकाराची आत्महत्या

Share

विजयपूर शहरातील टक्के रोडवरील एका कटिंगच्या दुकानात तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

सिद्दू नावी, वय २९ असे आत्महत्या केलेल्या केशकर्तनकाराचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. त्याने दुकानातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ही घटना गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: