Belagavi

बेळगावात हेस्कॉम लाइनमन दिनाचे आयोजन

Share

हेस्कॉमचे लाईनमन जनतेला प्रकाश देण्यासाठी जीव मुठीत घेऊन रात्रंदिवस काम करतात. त्यांचे हे कार्य अमूल्य आहे असे प्रशंसोद्गार बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी काढले.

बेळगावातील नेहरू नगर येथील गणपती मंदिराच्या प्रांगणात आज आयोजित लाईनमन दिवस कार्यक्रमाचे उद्घाटन आ. राजू सेठ यांनी केले. यावेळी यांच्याहस्ते लाईनमनचा सत्कार करण्यात आला.  नंतर बोलताना आमदार राजू सेठ म्हणाले की, लाईनमन जीवाची बाजी लावून सामान्य जनतेला प्रकाश देण्यासाठी रात्रंदिवस काम करत असून ते दररोज मोठ्या दबावाखाली काम करतात त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे म्हणाले की, आमदार राजू सेठ हे लाईन मॅन दिवस सोहळ्यासाठी आले याचा आम्हाला आनंद झाला आहे. ते बेळगावला 24 तास वीज जोडण्याचे काम करत आहेत. हेस्कॉम लाईनमन आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात त्यांनी रस घेतला आहे. ऊर्जामंत्र्यांच्या निर्देशानुसार हेस्कॉम अधिकारी, लाईनमन कार्य करत आहेत. गृहज्योती प्रकल्पात 200 युनिट्स मिळण्यासाठी आम्ही कार्यवाही करू, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला आमदार राजू सेठ, मंत्री सतीश जारकीहोळी यांचे आप्त सचिव पांडुरंग मण्णीकेरी, कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे, सहायक कार्यकारी अभियंता संजय हम्मनावर, सदानंद कुरेर, इनाम पटेल यांच्यासह लाईनमन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: